व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २७ लाखांच्या घरात गेली आहे. शहराची लोकसंख्या वाढल्याने त्याचा ताण शहरातील वैद्यकीय सुविधांवर आला आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १ हजार ५८९ खाटांची व्यवस्था आहे, तर खासगी रुग्णालयात ८,९९३ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. खाटांची सोय नकेच्या वाटांची लयात शहरात सद्य:स्थितीत महापालिका आणि खासगी रुग्णालय मिळून सद्य:स्थितीत १० हजार ५८२खाटांची सोय आहे.
पालिका महापालिकेचे शहरात असलेल्या महापालि रुग्णालय रुग्णालयांपैकी वायसीएम हे सर्वांत खाटांची नार ५८२ मोठे रुग्णालय आहे. येथे ७५० खाटांची व्यवस्था आहे. त्या तुलनेत रुग्ण या महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये त खाटांची संख्या कमी आहे. परिणामी, सर्वाधिक वायसीएम रुग्णालयावर येत आहे.
गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी अतिदक्षता विभागाची गरज असते, महापालिकेच्या सर्व रुग्णालये मिळून
एकूण ७९ आयसीयू बेड आहेत. त्यामुळे आयसीसूमध्ये दाखल होण्यासाठीदेखील वेटिंग असल्याची स्थिती असते. येणाऱ्या काळात वाढत्या लोकसंख्येनुसार रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविणे गरजेचे असणार आहे.
वायसीएम रुग्णालयासह आठ रुग्णालये, २८ दवाखाने, झोपडपट्टीत २० आरोग्यसेवा केंद्रे आहेत. महापालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दिवसाला २ हजार ३५४, तर वर्षाला ८ लाख ५९ हजार ३६२ रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर आंतररुग्ण विभागात दररोज सरासरी १०१ रुग्ण, तर वर्षाला ३६ हजार ९५४ रुग्णांनी ठी उपचार घेतला, अशी माहिती ते, महापालिका पर्यावरण अहवालात देण्यात आली आहे.
Discussion about this post