व्हीएसआरएस मराठी न्युज –गेल्या चार दिवसात पिंपरी चिंचवड शहरात H3N2 चा एकही रुग्ण नाही. जानेवारीपासून ते 14 मार्च पर्यंत एकूण 7 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 6 जण बरे होऊन घरी गेले तर एकाच मागील आठवड्यात मृत्यू झाला. H3N2साठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी दहा असे एकूण साठ बेड आरक्षित ठेवले आहेत. त्यात वायसीएम रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, कै ह.भ.प. कुटे मेमोरियल हॉस्पिटल आणि आकुर्डी रुग्णालयाचा समावेश आहे.
एकीकडे बदललेल्या वातावरणामुळे सर्वत्र आरोग्याच्या समस्या दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून एच३एन२ या नव्या विषाणूने डोके वर काढलेले असताना आता करोनाचेही पुनरागमन झाले आहे.
दुर्लक्ष नको, डॉक्टरचा सल्ला घ्या
आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला ५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गंभीर लक्षणे किंवा उच्च ताप असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पाच दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेतले जाऊ शकते पण, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post