व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य सेविका पदांची भरती जाहीर झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) सुरु आहे. यासाठी आरोग्य सेविका (एएनएम) पदाच्या ८८ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी थेट मुलाखतीतून महिला उमेदवारांची निवड होणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. आरोग्य सेविका पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या महिला उमेदवाराकडे एएनएम कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार रुपये पगार मिळणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपस्थित राहावे. पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.
१६ व १७ मार्च २०२२ रोजी ही मुलाखत होणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि एएनएस शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे आणावेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी पालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
Discussion about this post