व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी: निगडी सेक्टर क्रमांक 22 येथील रस्त्यावर ड्रेनेज चेंबरच्या बाजूला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. तरी सदरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजगृह हौसिंग सोसायटीच्या मागे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत, से.क्र.२२, फातिमा मस्जिद समोर,निगडी, पुणे-44) असणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरच्या बाजूला मोठा खड्डा पडलेला आहे.रात्रीच्या वेळेस या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. तसेच हि ड्रेनेज लाईन वारंवार चॉकअप होऊन मैला पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून रोगराई वाढण्याचा धोका वाढला आहे. तरी सदरील खड्डे हे तात्काळ बुजवून ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
Discussion about this post