व्हीएसआरएस मराठी न्युज -आकुर्डीत महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकड़े केली आहे.
तसेच प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळा परिसरातील पावसाचे पाणी, लोकमान्य हॉस्पिटल परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणारी मोठी स्टॉर्म वॉटर लाईन लोकमान्य हॉस्पिटल, साई मंदिर मागे, ठाणे जनता सहकारी बँकेच्या मागील बाजूस गणेश मंदिर जवळील वाहणाऱ्या नाल्यात येऊन मिळते. असे असूनही ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासनाच्या मार्फत काही दिवसांपूर्वी सदर स्ट्रॉम वॉटर लाईन ही नाल्यातील ड्रेनेज लाईनला जोडण्यात आली आहे. या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात पुराची अतिशय गंभीर परिस्थिति निर्माण होण्याची संभावना आहे. टेल्को कपूर सोसायटी, माताजी सुपर मार्केट मागील परिसर, साई दर्शन नगर, मोरे वाडा, आदर्श मित्र मंडळ, जैन मंदिर, साई अपार्टमेंट व जे. वाय. पाटील बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी तुंबुन पूर सदृश्य परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच लोकमान्य हॉस्पिटल पासून येणाऱ्या स्ट्रॉम वॉटर लाईन मधील पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. सदर स्टॉर्म वॉटर लाईन नाल्यात ड्रेनेज लाईनला जोडल्याने ड्रेनेज लाईन मधील पाण्याचा प्रवेश त्याच ठिकाणी थांबुन राहिल्याने संपूर्ण दत्तवाड़ी परिसरात पुरस्थिती निर्माण होऊ शकेल. यासर्व बाबीचा विचार करता सदर धोकादायक बांधकाम त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी पत्राद्वारे ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी यांच्याकड़े केली आहे.
Discussion about this post