व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आपला वार्ड आपली जिम्मेदारी या हेतूने डॉ कैलास कदम यांच्या वतिने प्रभागा साठी डास निर्मूलनासाठी धुर फवारणी शिबीर आयोजीत केले आहे.
शहरामध्ये डेंगीस चिकनगुनियाची साथ येऊ नये, यासाठी दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार डास निर्मूलनासाठी धुर फवारणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एक वेळा कोरडी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, झाडांच्या कुंड्या, फ्रिजच्या मागील ट्रे यामध्ये पाणी साचू देऊ नये, संशयित तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. आपल्या भागामध्ये रक्तनमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे अवाहन डॉ कैलास कदम यांच्या कडून करण्यात आले .
Discussion about this post