व्हीएसआरएस मराठी न्युज -४०वर्षीय तरुण दोन दिवसापासून असह्य पोटदुखी ,लघवी /संडास न होणे या लक्षणांनी त्रस्त होता .प्रकृती गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयातून नविन थेरगाव रुग्णालयातील तातडिक विभागात हलविण्यात आले.
प्रारंभिक तपासणीत आढळले की,रुग्ण बेशुद्ध अवस्थेत आहे व मूत्रपिंड निकामी झाले असून,हाताच्या नाडीचे ठोके लागत नव्हते.
रुग्णाला नळीद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू करून हृदयाचे ठोके वाढवण्याची औषधे सुरू केली व अतिदक्षता विभागात डॉ.संजय सोनेकर यांच्या देखरेखी खाली हलविण्यात आले.त्याची तपासणी केली असता सिटीस्कॅन मध्ये आतड्याला छिद्र पडून पोटात पू जमा झाला होता. व रक्तातील वाढलेल्या पांढऱ्या पेशींची संख्या , रक्तक्षय , कमी प्लेटलेट, यकृत व मूत्रपिंडाचे विस्कळीत रक्त चाचणी अहवाल, उच्च प्रोलॅक्टीन पातळी जे सुचित करते की रुग्ण सेप्टिक शॉक मध्ये आहे. शस्त्रक्रिया विभाग (डॉ. कांचन वायकुळे, डॉ. रोशन, डॉ. ज्ञानेश) आणि भूलतज्ञ डॉ. मनीष पवार यांच्या टीमने इमर्जन्सी ‘एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी’ ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली व रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे डॉ. संजय सोनेकर यांच्या देखरेखीखाली रुग्ण तीन दिवस व्हेंटिलेटर वर राहिला. रुग्णाला रक्तवाहिनीद्वारे पूर्ण आहार पुरविण्यात आला.
सहाव्या दिवशी रुग्णाला वार्डमध्ये हलविले गेले व दहाव्या दिवशी रुग्णाला सुखरूप स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. अभयचंद्र दादेवार जेष्ठ वैद्यकीय अधिकारी नवीन थेरगाव रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. लक्ष्मण गोफणे विभाग प्रमुख वैद्यकीय विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी पुरविलेल्या योग्य कुशल मनुष्यबळ , सर्व सुविधा व खंबीर पाठिंबा यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात जीवदान मिळाले.
Discussion about this post