व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिका आयुक्तांची प्रशासक पदावर नियुक्ती झाल्यावर शहरात पावसात तुंबू नये म्हणून, यासाठी महापालिकेच्या वतीने नालेसफाईचे कामकाज हाती घेतले आहे. त्यानुसार यंदाही नालेसफाईचे कामकाजाच येत्या दोन-तीन दिवसांत सुरूवात करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय परिसरात १७७ नाले आहेत. शहरवासीयांना पावसाळ्यामध्ये पाणी तुबूंन कोणताही त्रास होऊ नये, त्यांची साफसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा काढल्या जातात. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यास पाणी तुंबून नाल्याशेजारी रहिवासी भागात पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जाते.
तसेच प्रभाग क्र १४ व १५ लगत नाले साफ सफाई करणेबाबत माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आ प्रभाग अधिकारी यांना निवेदन देऊन मांगणी केली आहे.
प्रभाग कार्यालय नाल्यांची संख्या
अ -२५ आहे .नाल्यांच्या साफसफाईला येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात करण्यात येणार असून, पावसाळ्यापूर्वी हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली
Discussion about this post