व्हीएसआरएस मराठी न्युज –केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एम्स) दाखल झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
६३ वर्षीय सीतारामन एम्स रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, त्या नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल झाल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post