व्हीएसआरएस मराठी न्युज -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजूनही टळलेला नाही. केंद्र सरकार वेळोवेळी कोरोनापासून संरक्षणासाठी नव नवीन गाइडलाईन्स जाहारी करत आहे.
तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणावर ( Vaccination) भरही देण्यात येत आहे.
याच पाश्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करुन एक मोठी घोषणा केली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरु होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित राहील, असंही ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
मांडवीय पुढे म्हणाले, ”मला कळविण्यात आनंद होत आहे की 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होत आहे. तसेच, 60+ वयोगटातील सर्व लोकांना आता डोस मिळू शकतील. मी मुलांच्या कुटुंबींयाना आणि 60+ वयोगटातील नागरिकांना विनंती करतो की, त्यांनी तात्काळ कोरोनाची लस घ्यावी.”
Discussion about this post