व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी – डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देहू ते पुणे मार्गावर मोफत रुग्णवाहिका सेवा पालखी सोहळ्यातील वारकर्यांना देहू ते पुणे मार्गावर मोफत सेवादेणार आहे.आरोग्यमंच अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आक्रमभाई शेख आणि पदाधिकारी करीत आहे.
आकुर्डी येथे श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी आकुर्डीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात मुक्कामी येत असते. त्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी निमित्ताने आलेल्या सर्व वारकऱ्यांचे स्वागत विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटन अनेक वर्षां पासून पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करून त्यांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, औषधे वाटप, मार्गावर मोफत रुग्णवाहिका आणि अन्नदान करीत असते.
या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूर वारीसाठी जात आहेत.त्यांच्या आरोग्यसाठी विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रमोद गुप्ता आणि आक्रम भाई शेख आणि सहकारी मोठ्या प्रमाणात पालखी मार्गावरील साईपुजा बाग सोसायटी दत्तवाडी आकुर्डी येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी औषधे व अन्नदान याचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनांच्या वतीने सर्वोतोपरी तयारी केली आहे. अशी माहिती आक्रमभाई शेख यांनी दिली.