व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी शहराच्या विविध भागातील 284 नवीन कोरोना बाधित रुग्णांची बुधवारी नोंद झाली.
आजपर्यंत शहरातील 4 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 63 333 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 434 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 361 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
राज्यात आज 3142 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
तर आज दिवसभरात एकूण 3974 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 5600 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 25,114 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.90 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 19981 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5600 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 3384 सक्रिय रुग्ण आहेत.
Discussion about this post