व्हीएसआरएस मराठी न्युज –कुदळवाडीतील मधील युवा दिव्यांग व्यक्तीला स्पार्क मिंडा ग्रुप व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच माध्यमातून व्हिल चेअर देण्यात आली.
हालाखिच्या आर्थिक परिस्थितीमुळे व्हिल चेअर पासून वंचित राहिलेल्या कुदळवाडीतील एका दिव्यांग युवा नागरीकाला दिनेश यादव व आमदार पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क मिंडा कंपनीच्या सी एस आर फंडातून
व्हिलचेअर मिळवून दिल्याने या नागरीकाचे उर्वरित आयुष्य काहीसे सुखकर झाले असल्याने या नागरीकाच्या कुटूंबियांनी आभार मानले आहेत .
कुदळवाडी परिसरातील राहणारे 27 वर्षीय मोहम्मद शाबीर यांना दोन्ही पायांनी चालता येत नव्हे त्यामुळे त्यांना हिंडणे फिरणे मुश्किल झाले होते. या परिस्थितीमुळे त्यांच्यात दिवसेंदिवस नैतश्य दिसून येऊ लागले होते. या गंभीर समस्येचा विचार करून आणि त्यांना हिंडता फिरता यावे या उद्देशाने नागरीकाला व्हिलचेअर मिळवून दिली
या व्हिलचेअरमुळे मोहम्मद शाबीर यांच्या भावी आयुष्यासाठी मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी मला बोलुन दाखवत आभार मानले .
यावेळी दिनेश यादव, सोमनाथ यादव, दिपक घन, रवी गौतम,अरबाज खान, रामकुमार पासवान, गौरव त्रिपाठी, सौरभ त्रिपाठी, मुजफ्फर सिद्दिकी उपस्थित होते.
Discussion about this post