व्हीएसआरएस मराठी न्युज –र्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.
आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने लाईफपॉईंट हॉस्पिटल, वाकड यांच्या वतीने विशेष कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी विशेषतः महिलांनी आवर्जून लाभ घेतला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर डॉ राकेश नेवे राहुल कलाटे, हॉस्पिटल व्यवस्थापक यांच्यासह उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांशी संवाद साधला.
कर्करोग प्रतिबंध, लवकर तपासणी, उपचार आणि काळजी याबद्दल आपल्याला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून या आजाराला पळवून लावता येते.
डॉ राकेश नेवे कॅन्सर सर्जन डॉ रवी वाटेगावकर आणि डॉ अश्विन राजभोज केमोथेरपी तडन्या डॉ ज्योती डेकाटे आणि डॉ भरत ओझा हे उपस्थीत होते,
लाइफपॉइंट तंभाकू सोडवन्याच्या उपक्रमाबादल राहुल कलाटे यांनी हॉस्पिटल चे अभिनंदन करूण कॅन्सर विषयी आव्हान केले .लाइफपॉइंट हॉस्पिटल येथे कॅन्सर कॅम्प 11 फेब्रुवारी पर्यत मोफत असुन् तपासणी सर्वान्नी लाभ घ्यवा असे डॉ राकेश नेवे यांनी केले आहे.
जगभरात दरवर्षी ८.२ दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. तथापि कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या गोष्टी टाळण्यासाठी निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे.
Discussion about this post