व्हीएसआरएस न्युज पुणे-निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांना काम करायचं असून थोडी पिशवी मोकळी करा,’ असा सल्लाही पालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर ‘पक्षाची निवडणूक व्यूहरचना आणि सोशल मीडियाचा वापर’ या विषयावर विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाकडून नगरसेवकांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी खासदार बापट आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी या दोन्ही नेत्यांनी ‘पक्षातील नगरसेवकांनी नागरिकांमध्ये मिसळावे, त्यांच्याशी संवाद साधावा’ अशा सूचना केल्या. निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर असून कशा पद्धतीने सामोरे जावे त्यासाठी पक्षाची काय भूमिका असेल, याचे मागदर्शन यावेळी करण्यात आले.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पक्षाने केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवायला हवीत, त्याचे नियोजन कसे असावे, त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबतही नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
Discussion about this post