व्हीएसआरएस न्युज आयपीएल लढतींना आता प्रेक्षकांची साथ लाभणार आहे. आयपीएलच्या आयोजन समितीकडून बुधवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रेक्षक संख्या निश्चित ठरवण्यात आली नसली तरी क्रिकेट स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के क्रिकेटप्रेमींना प्रवेश देण्यात येण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी 2019 सालानंतर अर्थातच तब्बल 28 महिन्यांनंतर आयपीएल लढतींना प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्स व तीन वेळा अजिंक्य ठरलेला चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये 19 सप्टेंबर रोजी उर्वरित आयपीएलची सलामीची लढत रंगणार आहे.
आयपीएल आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आले की, कोरोनामुळे 2020 सालातील आयपीएल व यंदाचे पहिल्या सत्रातील आयपीएल प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. पण आता येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया उर्वरित आयपीएल मोसमासाठी प्रेक्षकांसाठी दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या तीन ठिकाणी आयपीएलच्या लढती रंगणार आहेत. पण यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमानुसारच मर्यादीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार आहे.
आज16 सप्टेंबरपासून तिकीट विक्रीला सुरुवात
आयपीएलच्या उर्वरित मोसमातील लढतींच्या तिकीट विक्रीला 16 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलची अधिकृत वेबसाईट www.iplt20.com येथे क्रिकेटप्रेमींना तिकिटे विकत घेता येऊ शकणार आहेत. तसेच PlatinumList.net या वेबसाइटवरही आयपीएलची तिकिटे उपलब्ध असणार आहेत.
Discussion about this post