व्हीएसआरएस न्युज जम्मू येथे आयोजित करण्यात आलेल्या 55 व्या कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स व 25 व्या रिदमिक जिम्नास्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघाने आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पिंपरी-चिंचवडच्या हर्षिता काकडे हिचे महिला संघाला सांघिक रौप्यपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान ठरले. तसेच हर्षिताला प्रशिक्षक म्हणून एलिट फिटनेस अकॅडमी चे मनोज काळे व प्रिया जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
जम्मू येथील एम एस स्टेडियमवर ही स्पर्धा झाली या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिम्नास्टिक संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करत स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली. महाराष्ट्राच्या महिला संघाचे सांघिक सुवर्णपदक केवळ 1.00 गुणांनी हुकले . पश्चिम बंगाल संघाने महिलांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले. तर पुरुषांमध्ये उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राला कडवी लढत देत सुवर्णपदक पटकाविले तर महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे महिला – हर्शिता काकडे ,सृष्टी भावसार, रिया केळकर ,देवयानी कोलते ,अनुष्का पाटील संघ प्रशिक्षक, रामकृष्ण लोखंडे व्यवस्थापक ,केतकी गोखले
पुरुष – निशांत करंदीकर ,सार्थक राऊल , आर्यन दवंडे , मेघा रॉय सोहम ढोले ,संघ प्रशिक्षक शुभम गिरी व अद्वैत वांगीकर
या सुवर्णमय कामगिरीबद्दल महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नास्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे , सचिव मकरंद जोशी, कोषाध्यक्ष पवन भोईर तसेच प्रवीण ढगे , संजोग ढोले व सर्व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.
Discussion about this post