व्हीएसआरएस न्युज पिंपरी- एटीएमची देखभाल आणि सुरक्षेसाठी बँकांकडून एजन्सीची नेमणूक केली जाते. त्यांच्या बेजबाबदारीने एटीएम फोडण्याच्या घटना घडत आहेत.
हरियाणा येथील एका टोळीने भोसरीतील पांजरपोळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडले. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. पांजरपोळ येथील एटीएमची जबाबदारी असलेल्या संस्थेचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल, असेही आयुक्तांनी खडसावून सांगितले.
बँकांनी नवीन एटीएम सुरू करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी. सुरक्षेचे मापदंड पाळून एटीएम सुरू करावे. एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्यासाठी सायरन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश करावा. ते चालू स्थितीत असल्याचे वारंवार तपासायला हवे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालताना देखील नेहमीच लक्ष ठेवतात. चिखली येथे पोलिसांनी रात्री लक्ष ठेवल्यामुळे एक एटीएम फोडीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बँकांनी पोलिसांना एटीएमची माहिती तर द्यावीच. परंतु नवीन सुरू करताना पोलिसांची परवानगी घेतली पाहिजे. त्याबाबत बँकांना पोलिसांकडून पत्र देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
Discussion about this post