व्हीएसआरएस न्युज-पिंपरी येथील मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजेनच्या मार्फत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवे योजनेच्या या मौलिक कार्याला पिंपळे सौदागर येथील लायन्स क्लब, या सामाजिक संस्थेची साथ लाभली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. विनिता बसंतानी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “माणसाकडे इच्छा असेल तर सर्व चांगल्या गोष्टीची आपोआप साधल्या जातात.” त्याचबरोबर प्रत्येकाने अशा चांगल्या सामाजिक संस्थांची मदत करून देशाच्या विकासाला हातभार लावावा.
या कार्यक्रमास लायन्स क्लबचे क्षेत्रीय अध्यक्ष श्री. धनराज मेघनानी, पिंपळे सौदागर येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. अंजूम शकूर सय्यद, लायन्स क्लबच्या सचिव सौ. इंदू सूर्यवंशी, उन्नती फौंडेशनच्या संचालिका सौ. कुंदा भिसे त्याचबरोबर महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक श्री. शकूर सय्यद, प्रा. डॉ. अजित गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. लिना सुनील मोदी यांनी प्रभारी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
Discussion about this post