व्हीएसआरएस न्यूज |पिंपरी|
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बॉम्ब निकामी करणारं बीडीडीएसचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना मध्यरात्री चाकणमध्ये ही घटना घडली असून स्फोटामुळे परिसर हादरला असल्याचं समोर येत आहे. एटीएमजवळ स्फोट घडवून आणल्यानंतर अज्ञातांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. काही विशिष्ट स्फोटके वापरून हा स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज (बुधवारी, दि. 21) मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण मधील महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडताना स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले.
स्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम मधून रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
Discussion about this post