व्हीएसआरएस न्युज नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.
टोकियो आलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताचं पदकाचं खातं उघडलं होतं.
मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक जिंकून दिलं. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटमध्ये कांस्य पदक जिंकलं. बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने देखील दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव पटकावलं. लवलीना बॉक्सिंमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर बनली.
त्यानंतर रवी दहियाने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरं रौप्य पदक जिंकून दिलं. पैलवान रवी दहियाने 57 किलो फ्री स्टाईल गटात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत 41 वर्षांंनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून दिलं. आज नीरज चोप्राने सुवर्ण पदक आणि बजरंग पुनियाने कुस्तीत भारताला कांस्य पदक जिंकून दिलं आहे.
Discussion about this post