व्हीएसआरएस न्युज पिंपरी -शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिरे, इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेच्या वतीने आकुर्डीतील खंडोबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले.
कोरोना कमी झाल्याने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी रूपेश पटेकर, राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश मंदिरे नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितीन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्झांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ, राजेश अवसरे, ऋषिकेश जाधव, विपुल काळभोर, के. के. कांबळे, गणेश वाघमारे, शंकर बिराजदार, डी. एम. कोळी, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, अनिता पांचाळ उपस्थित होते. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव पिंपरी कमी झालेला आहे पॉझिटिव्हिटी रेट हा तीन टक्केच्या खाली आला आहे. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या अनेक घटकांचे घटकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. ‘
Discussion about this post