व्हीएसआरएस न्युज मोताळा – दि ८ सप्टेंबर २१ (बुधवार): तालुक्यात परवा रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नद्यांना महापूर आले. परीसरातील नदीकाठच्या शेतजमिनींचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्षरश शेतजमिनी पिकासहीत खरडून निघाल्या. कपाशी, मका, साेयाबिन या पिकाचे माेठे नुकसान झाले.
अनेक गावामधे लाेकवस्तीत पाणी शिरले, घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर पडले आहेत. माेताळा तालुक्यातील शिरवा, सहस्रमुळी, खरबडी, तराेडा, परडा, वारुळी, काेथळी, भाेरटेक, वडगाव, या परीसरातील पिंकाचे माेठे नुकसान झाले आहे. शिरवा येथील किसना नरहरी दिवाने, संताेष वानखेडे, बळीराम दिवाने, कल्पना दादाराव उमाळे, गाेविंदा नामदेव दिवाने, राष्टपाल खंडारे, सहस्रमुळी परीसरातील मानिक शिंदे या शेतकऱ्यांची शेती पुरामुळे पिकासहीत खरडून वाहुन गेली आहे. मानिक शिंदे यांची विहीर पुर्णपणे खचली आहे.
दरम्यान मा.आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व परिस्थितीची माहीती काल ना. विजय वडेट्टीवार व ना. बाळासाहेब थोरात यांना फाेनवरुन देवुन नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना तात्काळ मदत देणेबाबत चर्चा केली. तसेच सपकाळ यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याशीसुध्दा याबाबत चर्चा केली.
Discussion about this post