व्हीएसआरएस न्युज पुणे : लोणावळ्यात टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई, पुणे तसेच अनेक जिल्हयातून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस पुन्हा माघारी पाठवत आहेत. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी जमावबंदी आणि पर्यटनस्थळ बंदी आदेश असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार अशा लागोपाठ आलेल्या ती दिवसाच्या सुट्ट्यांमुळे अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, पुण्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट दिसत आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पर्यटकांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे एरवी सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटकांनी फुलून जाणारा लोणावळ्यातील भुशी डॅमचा परिसार रविवारी निर्मनुष्य भासत आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा विहारासाठी गर्दी करत असतात. मात्र, आज मात्र हा परिसर निर्मनुष्य आहे.
Discussion about this post