व्हीएसआरएस न्युज हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. तीला कोणीतरी फुस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
त्यानूसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तीचा शोध घेतला जात होता.
दरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तीने चार मित्रांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिस ठाण्याचे तपास पथकांनी शोध सुरु केला. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपीला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत मुलीचे तीच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती रुसून तीच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात यातील एक आरोपी तीला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला मित्राकडे सोडतो असे सांगितले. यानंतर तीला एका ठिकाणी नेऊन तीच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर संबंधीत तरुणाने त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तीच्यावर अत्याचार केला. याप्रकारे इतर आणखी दोघा मित्रांनी येऊन तीच्यावर अत्याचार केला.
हडपसर हद्दीमधील पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यांमध्ये चार जणांविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघां आरोपींना गुरूवारी रात्री जेरबंद केले असून त्याचे दोन मित्र फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. पालकांशी वाद झाल्याने पिडीत मुलगी घर सोडून मित्राला भेटायला निघाली असताना ही घटना घडली.