व्हीएसआरएस न्युज प्राधिकरण-
२१ ऑगस्ट राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धा
आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी पाठिशी घेऊनच आपण पुढे जात असती. वाईट आठवणी विसरून आणि चांगल्या अनुभवांची मनापावाल करत राहतो. कोरोनाच्या कठीण काळात आपण सगळे तरलो ते सकारात्मक आजच भविष्यातही सकारात्मक मानसिकता, सकारात्मक आठवणी आणि सकारात्मक विचार या आवश्यकता असणार आहे. हेच निमित्त साधून आणज्येष्ठ नागरिक दिना निमित्त घेऊन आलो आहोत.
आतापर्यंत तुम्हाला अनेक अनुभव आले असतील. असा कोणताही चांगला, सकारात्मक आणि लक्षात राहण्यासारखा अनुभव लिहा आणि आम्हाला पाठवा…
शनिवार, २१ ऑगस्ट रोजी नगरसेवक अमित गावडे यांच्या
कार्यालयात स्वतः येऊन लेखनाचा कागद आणून द्यावा.
सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत आपण आठवणी आणून देऊ शकता. सहभागी होणाऱ्या प्रत्येक लेखकाचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
एकच अनुभव, आठवण लिहावी. कागदावर पाटपोट न लिहिता स्वतंत्र कागदावर लेखन करावे. सोबत आपला फोटो, मोबाईल नंबर पत्ता द्यावा.
स्त्री आणि पुरुष गटांमधे एकूण १० आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जमा झालेले निवडक अनुभव दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येतील. यथावकाश त्याचे प्रकाशन करून आपल्याला आगळीवेगळी भेट देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
मग आता विचार करत बसू नका. लगेच लिहायला घ्या आणि
२१ ऑगस्ट रोजी आमच्याकडे खालील पत्त्यावर घेऊन या
जनसंपर्क कार्यालय : नगरसेवक अमित राजेंद्र गावडे ४/६ एडीसी, साईदर्शन अपार्टमेंट, आकुर्डी पोलिस चौकीजवळ, रागा हॉटेलच्या मागे, निगडी, पुणे ४११०४४ संपर्क : संदिप शेळके : ९६८९५५४८८३, अक्षय भोसले : ७०८३३२५६७९
Discussion about this post