व्हीएसआरएस मराठी न्युज -सशस्त्र सेना ध्वज दिवस किंवा ध्वज दिन हा भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित केलेला दिवस आहे. १९४९ पासून भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त निधी संकलनाची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत- १. युद्धात झालेल्या जीवितहानीमध्ये सहकार्य, २. सैन्यात काम करणाऱ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आणि सहकार्यासाठी, 3. सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी.
या दिवशी, ध्वज, सशस्त्र दलाच्या चिन्हाचे वाटप करून निधी संकलन केले जाते. या ध्वजातील तीन रंग (लाल, गडद निळा आणि हलका निळा) तिन्ही सैन्यांचे प्रतिनिधित्व करतात.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सशस्रसेना ध्वजदिन निधी उभारला जातो. देशाच्या संरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता किंवा वीर पिता, दिव्यांग सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी या निधीचा वापर केला जातो.
त्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून १८ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यात आयुक्त दोन हजार रुपये, वर्ग एकचे अधिकारी एक हजार रुपये, मुख्याध्यापकांसह वर्ग दोनचे अधिकारी पाचशे रुपये, शिक्षकांसह वर्ग तीनचे कर्मचारी २०० रुपये आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी १०० रुपये देणार आहेत. त्यांच्या जूनच्या पगारातून ही रक्कम कपात केली जाणार असल्याचे प्रशासन विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.
Discussion about this post