व्हीएसआरएस मराठी न्युज –वरळी येथील नेहरू आर्ट गॅलरीत मुंबई आर्ट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. या मुंबई आर्ट फेअरमध्ये भोपाळ येथील कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे तसेच सुंदरतेची परिभाषा नोंदवणारे चित्र या मुंबई आर्ट फेअर मध्ये भोपाळ येथील कलाकारांनी लावले आहेत. 20-25 चित्र तीन कलाकारांनी काढले असून हे चित्र काढण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी त्यांना लागला आहे.
गणपती, राम सीता विवाह, हनुमान, अश्व, सुंदरतेची परिभाषा स्पष्ट करणारे भारतीय नारीचे चित्र असे विविध चित्र येथे लावण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण आर्ट गॅलरीत निरनिराळ्या कलाकृती लावण्यात आल्या आहेत.
भोपाळ येथील रमाशंकर मिश्रा यांनी राम सीता विवाहाचे चित्र काढले आहे. या विवाह सोहळ्याचे वर्णन चित्रातून केलेले फार कमी ठिकाणी दिसते. तसेच या विवाह सोहळ्यात विश्वामित्र ऋषी सहभागी झाले आहेत व श्रीरामाच्या जीवनात हनुमान हे सीताहरणानंतर आले. मात्र, येथे सीतेच्या सखीने पकडलेल्या कापडी पंख्यात हनुमान या विवाह सोहळ्याकडे पाहतोय असे दाखवण्यात आले आहे. बूथ क्रमांक 42 वर हे चित्र लावण्यात आले आहे. रामचरित मानस वाचताना चित्रकार रामाशंकर यांना त्यातील एका चौपाई वरून हे चित्र काढण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी ती चौपाई सुद्धा या चित्रात लिहिली आहे.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र
30 ऑक्टोबर 2022 हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून प्रेक्षकांना कलेचा अविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. नेहरू आर्ट गॅलरीत मुंबई आर्ट फेअरला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद आहे. आम्ही येथे भोपाळ येथून सहभाग नोंदवला आहे. फ्री स्टाईल तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र आम्ही येथे आणले आहेत, असं भोपाळ येथील चित्रकार शंकर राजपूत यांनी सांगितले.!
Discussion about this post