व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला पूर्व भागात एक धोकादायक इमारत कोसळली असून, ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची माहिती आहे.
आतापर्यंत ८ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चारही इमारतींना बीएमसीने नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. सर्व लोकांना बाहेर काढणे हे पहिले प्राधान्य आहे. मंगळवारी सकाळी मिळून लोकांना बाहेर काढले जाईल आणि उर्वरित इमारत पाडण्यात येईल. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.
Discussion about this post