व्हीएसआरएस मराठी न्युज -सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सोहळ्यात खुमासदार सूत्रसंचालनाने उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे (वय ४६) यांचे बुधवारी भीषण अपघातात निधन झाले.महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ अपघात घडला. या घटनेत आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाण्याच्या देवदयानगरमध्ये राहणारे दीपेश मोरे महाड येथे शिमगोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
कार्यक्रम करून परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सहकारी श्रद्धा जाधव, रश्मी खावणेकर, कोमल माने किरकोळ जखमी झाल्या आहेत.
Discussion about this post