व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट 2022 सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यान्वित आहे. येथे विविध कौशल्यधारित ट्रेड्स शिकवले जातात. या विविध ट्रेड्ससाठी यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जोडारी (फिटर, प्रवेश क्षमता- 20, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण ), कातारी (टर्नर, प्रवेश क्षमता- 20, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण), पत्रे कारागीर (शीट मेटल वर्कर, प्रवेश क्षमता- 40, प्रशिक्षण कालावधी 1 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), संधाता (वेल्डर, प्रवेश क्षमता- 80, प्रशिक्षण कालावधी 1 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), आरेखक यांत्रिकी (ड्राफ्टमन मेकॅनिक, प्रवेश क्षमता- 20, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण ), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन, प्रवेश क्षमता- 40, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण), इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक(प्रवेश क्षमता- 48, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण) , इन्स्ट्रुमेन्ट्स मेकॅनिक(प्रवेश क्षमता- 24, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण), मेकॅनिक मोटार व्हेईकल(प्रवेश क्षमता- 48, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण) प्रशितन व वातानुकुलीत टेक्निशियन (रेफ्रीजरेशन अंड एअर कंडीशनर टेक्निशियन, प्रवेश क्षमता- 24, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण), नळकारागीर (प्लंबर, प्रवेश क्षमता- 48, प्रशिक्षण कालावधी 1 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), रंगारी (पेंटर, प्रवेश क्षमता- 20, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), तारतंत्री (वायरमन, प्रवेश क्षमता- 20, प्रशिक्षण कालावधी 2 वर्षे, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण), कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (प्रवेश क्षमता- 48, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण) या ट्रेड्सच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
विविध ट्रेड्स प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत बाबत माहिती घ्यावी.
Discussion about this post