व्हीएसआरएस मराठी न्युज –एमपीएससीकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे.
या संदर्भात एमपीएससीने परिपत्रक जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. 3 मार्च रोजी राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
विविध कारणामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी 2 मार्च 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
Discussion about this post