व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आळंदी जल केंद्रातून योग्य त्या प्रमाणात नागरिकांसाठी व भाविकांसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे.
आळंदी शहराच्या च्या विविध भागात वारकरी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची,स्वयंपाक वापरासाठी काही टॅंकर उपलब्ध आहेत.नगरपरिषद व प्रशासन
भाविकांसाठी शौचालय वापरा करीता पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पाण्याचे टँकर तिथे उभे करण्यात आले आहेत.आळंदी प्रशासन व प्रशासकीय प्रशासनाचे भाविकांच्या सुविधे साठी अजून काही टॅंकर २०,२१जून उपलब्ध होणार आहे.
पी एम पी एल बस स्टँड ,एस टी स्टँड, केंद्रे महाराज उजवी बाजू,मठ,चैतन्य आश्रम,साधक आश्रम,केंद्रे महाराज मठ डावी बाजू,वारकरी शिक्षण संस्था, चार नंबर शाळा-४,मातंग समाज,नवीन डी पी रोड, ठाकूर बुवा धर्मशाळा,शाळा न.३,विश्रांत वड,इंद्रायणी हॉस्पिटल जवळ,गौशाळे जवळ,शुभमकरोती सोसायटी, सिद्धबेट बाग ,नानश्री,डोंबळे धर्मशाळा इ. ठिकाणी भाविकांसाठी टॉयलेट/स्वच्छता गृह याची सोय करण्यात आली आहे.
नृसिंव्ह सरस्वती मठ बंधाऱ्या शेजारील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. भक्ती सोपान पुला जवळ नदीपात्रात मोठया प्रमाणात जलपर्णी वाहून आल्याचे दिसून आली होती.सद्यस्थितीत काढण्याचे काम सुरू आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात, भैरवनाथ मंदिरा शेजारी भाविकांच्या वैदयकीय तपासणीची तसेच फ्रुटवाले धर्मशाळा लगत सत्यभाई सेवा संघटना पुणे,तर्फे वैद्यकीय तपासणी मोफत उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post