व्हीएसआरएस मराठी न्युज -पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात कामगाराला प्राण गमवावे लागले.
50 फूट उंचीवरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. पुणे शहरात पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. मूलचंद्र कुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो मूळ उत्तर प्रदेश येथील राहणारा होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना झालेल्या अपघातात 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला. पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ रविवार 15 मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली.
या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामगाराने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते, मात्र 50 फूट इतक्या उंचीवरुन खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Discussion about this post