व्हीएसआरएस मराठी न्युज –
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण यातील अनिल जयसिंघानीला गुजरातमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यात अनिल याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीअटकेत आहे.अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.अनिल जयसिंघानी यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध सुरु होता.अनिल जयसिंघानी याचे देशभरातील राजकीय नेते आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
Discussion about this post