व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने विकसित होणारे व सुमारे 25 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून शहर प्रसिद्ध आहे. शहरामध्ये विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण येथील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
स्मार्ट होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकमेव वल्लभनगर बस स्थानक आहे. या बस स्थानकामधून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रवासी प्रवास करत असतात. दररोज किमान पाच हजार प्रवासी तसेच ST बसेसच्या 350 फेऱ्या वल्लभनगर बस स्थानकातून होतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक करणारे हे मुख्य ठिकाण आहे. तसेच भारतातील सर्वात पहिले ISO मानांकन प्राप्त असलेले बस स्थानक आज दुरावस्थेमध्ये आहे.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मोरवाडी, शाहूनगर, दापोडी, पिंपरीगाव, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, भोईर, गावडे कॉलनी, लालटोपीनगर, वल्लभनगर, संत तुकारामनगर, चिंचवड स्टेशन परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते केले जाणार आहेत. त्यासाठी निधी मिळणार आहे. औषध निर्माण महामंडळ (हाफकिन) येथील रस्तेही सिमेंट काँक्रीटीकरणाचे केले जाणार आहेत.
प्रत्येक आमदाराला पाच कोटींचा निधी…..
विधानसभेच्या प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास निधी म्हणून पाव कोटीची मंजुरी असते. यामध्ये संबंधित लोकप्रतिनिधीनी मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यास मंजुरी असते. एखाद्या आमदाराचा संबंधित निधी वर्षभरात खर्च न झाल्यास शिल्लक राहिलेला निधी पुढील वर्षांच्या निधीत वर्ग करण्यात येतो. मात्र. निधीची पुढील वर्षाच्या फंडातून कपात होते.
पिपरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना या वर्षांसाठी ३ कोटी ५२ लाखांचा निधी अधिक मागील वर्षाचा १ कोटी ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला. यापैकी सुमारे ४ कोटी ७६ लाख ४० हजारांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळवत अण्णा बनसोडे यांनी यंदा आघाडी घेतली आहे.
Discussion about this post