व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -नितीन नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेऊन शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे.
दरम्यान त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. परप्रांतियांच्या विरोधातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या अनेकवेळा चर्चा होत असतात. त्यांच्या या स्वभावाचा आणि योग्य उत्तर देण्याचा शिवसेनेला फायदा होणार आहे. यामुळेच शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले आहे.
नितीन नांदगावकर यांनी २०१९ मध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत राहून आपलं काम सुरू ठेवलं होतं. त्यांचं काम पाहून आणि आगामी महापालिका निवडणुकांचे औचित्य साधून शिवसेनेने त्यांच्या हाती उपनेतेपदाची सूत्रे सोपवली आहेत.
Discussion about this post