व्हीएसआरएस मराठी न्युज -पंढरपूर 2019 मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.
यावेळी भाविकांनी पांडुरंग चरणी तब्बल पाच कोटी सत्तर लाख रुपयांचे दान अर्पण केले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी दिली आहे.
भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गुरव यांनी सांगितले. दरम्यान, आषाढी वारी सोहळ्यानंतर चातुर्मासास प्रारंभ झाला असून पंढरपूरात विविध मठ आणि धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.
Discussion about this post