व्हीएसआरएस मराठी न्युज –भगतसिंह काेश्यारी : ए साेल डेडीकेटेड टू द नेशन’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगतसिंह काेश्यारी : ए साेल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक हाेय, असे गाैरवाेद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी येथे काढले.
तुषार कांती बॅनर्जी लिखित भगतसिंह काेश्यारी : ए साेल डेडीकेटेड टू द नेशन या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती काेविंद यांच्या हस्ते राजभवनाच्या दरबार हाॅलमध्ये करण्यात आले. या वेळी राज्यपाल भगतसिंह काेश्यारी, रामनाथ काेविंद यांच्या पत्नी सविता काेविंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लेखक डाॅ. बॅनर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते.
राज्यपालांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले हे पुस्तक वाचकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारे आहे. राज्यात राज्यपाल म्हणून आपली तीन वर्षे यशस्वीपणे पूर्ण करत असताना काेविड काळातही त्यांचे काम सुरू हाेते.राज्यपालांनी राजभवनाला लाेकभवनात परावर्तित केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.पदाच्या प्रलाेभनाला बळी न पडता देशसेवेचा भाव आपल्या कर्तृत्वाला अधिक उंची देताे. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने राष्ट्रउभारणीत याेगदान दिल्यासदेश निश्चितच उज्ज्वल वाटचाल करेल, असे राज्यपालांनी सांगितले.
Discussion about this post