व्हीएसआरएस मराठी न्युज –
देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र आता या इमारतीवरून देशभरात राजकारण सुरू झालं आहे.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तसेच या मोठ्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रित न करणे हा त्यांचा अपमान आहे, असं विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे.
या राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कार
- आरजेडीने बुधवारी सकाळीच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
- संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाही.
- डीएमके नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार आहे.
- तृणमूल काँग्रेसने या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.
- यानंतर आम आदमी पक्षानेही या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले.
- भारतीय सीपीआयने मंगळवारी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली होती.
Discussion about this post