व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये सायक्लॉथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
सध्या शहरात स्वच्छाग्रह मोहिम राबविली जात आहे. शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी या मोहिमेमध्ये नागरी सहभाग वाढण्यासाठी सायक्लॉथॉनचा उपयोग होणार आहे. कल्पतरु सोसायटी ते वाकड असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सायकल आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
Discussion about this post