व्हीएसआरएस मराठी न्युज -नगर महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत पण नगर येथे त्यांच्या जागेवर आत्तापर्यंत कोणाची नियुक्ती झाली नाही.
सध्या राज्यामध्ये बदल्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झालेले आहे त्यातच आता महानगरपालिकेमध्ये उपायुक्त या पदावर असलेले यशवंत डांगे हे गेल्या दोन वर्षांपासून उपायुक्त म्हणून या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम या ठिकाणी राबवले होते तसेच प्रशासकीय पातळीवर त्यांचा चांगला अनुभव होता नगर महानगरपालिकेला स्वच्छ अभियान अंतर्गत नुकतेच गौरविण्यात आलेले होते.
डांगे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्यामुळे नगर येथे त्यांच्या जागेवर अद्याप पर्यंत कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
दरम्यान मागील महिन्यामध्ये महापौर रोहिणी शेंडगे यांनी राज्य शासनाकडे पत्र पाठवून प्रशासनाच्या कारभारीच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे अनेक अधिकारी हे बदलीच्या मार्गावर असल्याचेही बोलले जात होते त्यातच आता उपायुक्त डांगे यांची बदली झाल्यामुळे महानगरपालिकेमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Discussion about this post