व्हीएसआरएस मराठी न्युज – दिनांक 27 जुलै महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि देशातील सर्वोत्तम माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा भोसले युथ फाऊंडेशन यांच्या वतीने आणि शिवसेना शाखा मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती , ताम्हाणेवस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 13 मधील शाळेतील विद्यार्थांसाठी 10,000 वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याच वेळी शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुलदादा सर्जेराव (आबा) भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोविड काळात उद्धवसाहेब ठाकरे यांनी कश्याप्रकारे राज्याची काळजी घेतली, विद्यार्थ्यासाठी हिताचे निर्णय घेतले.
त्यामूळे आपण सर्वांनी साहेबांना दीर्घ आयुष्य मिळो हिच प्रार्थना करुन आज जरी पक्षावर संकट असेल तरी शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहील कारण संघर्ष करुन उभा राहणे ही वंदनीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे अशा शब्दात व्यक्त झाले यावेळी या कार्यक्रमासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, युवासेना तालुकाप्रमुख दत्ता मोहोळकर भोसरी विधानसभा ज्येष्ठ शिवसैनिक मा.समन्वयक भोसरी विधानसभा सर्जेराव नारायण (आबा) भोसले उपशहर प्रमुख नेताजी काशीद ,शहरसंघटक रावसाहेब थोरात ,विभाग प्रमुख सतीश डीसले, उपविभागप्रमुख संजय गाढवे,चंद्रकांत जाधव, दादाराव ठाकरे, गोविंद गोरडे ,शाखाप्रमुख आनंद हिंगे, सुखदेव देवकर ,हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे ,अशोक गायकवाड, अनंत मते, युवासेना विभाग प्रमुख – प्रवीण पाटील भोसरी विधानसभेचे महिला संघटिका जनाबाई गोरे, उपस्थित होते.
Discussion about this post