व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिकेच्या लिंक रोड येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात इमारती उभारल्या आहेत. एका इमारतीमध्ये 112 सदनिका असून, दोन इमारतीतील 224 सदनिकांचे वितरण होणे बाकी आहे.
पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून स्वहिस्सा रक्कम जमा करून घेतली जात आहे. अशा लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे.
नियमानुसारच सदनिकांचे वितरण : अतिरिक्त आयुक्त
कागदपत्रांची पूर्तता करणारे तसेच, स्वहिस्सा भरणारा पात्र लाभार्थ्यांना लवकरच या दोन इमारतींमधील 224 सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. त्यासंदर्भात कार्यवाही वेगात पूर्ण केली जात आहे. सोडत कार्यक्रमासाठी पात्र लाभार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सांगितले.
Discussion about this post