व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आदर्श व्यक्ती, संस्थांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी (दि.16) गौरव करण्यात आला.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, माजी मंत्री, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, पुण्याचे शहरप्रमुख गजाजन धरगुडे, युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.
शहरातील लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा गौरव केला. त्यामध्ये वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प बंडोपत शेळके, ह.भ.प महादेव भुजबळ, आधार भुषण पुरस्काराने कष्टकरी संघटनेचे बाबा कांबळे, सेवा भुषण पुरस्काराने वृद्धाश्रम चालविणा-या डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य, क्रीडा शिक्षक पुरस्काराने बन्सी आठवे, कामगार भूषण पुरस्काराने किशोर ढोकळे, सौंदर्यवती पुरस्काराने पुनम डायडेम, स्वामी भुषण पुरस्काराने शिवतेजनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरी शेळके, शौर्य पुरस्काराने धनश्री जाधव, समाजभुषण पुरस्काराने आपला परिवाराचे एस.आर.शिंदे, पोलीस मित्र भुषण पुरस्काराने गजानन चिंचवडे, क्रीडा भुषण पुरस्काराने आयपीएलमध्ये पहिला शतक करणारा सांगवीतील ऋतुराज गायकवाड, समाज भुषण पुरस्काराने मंदार देव महाराज, क्रीडा पुरस्काराने सायकलिंग करणारे बाबा भोईर, भुषण पुरस्काराने भाऊसाहेब कोकाटे, स्वामी भुषण पुरस्काराने स्वामी समर्थ मंडळ, निसर्ग भुषण पुरस्काराने जग्गनाथ जरग वृक्ष मित्र, वृक्ष संवर्धन, कर्तव्य भुषण पुरस्काराने वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, आदर्श भुषण पुरस्काराने ग्रीन्स सोसायटी, पर्यावण भुषण पुरस्काराने जगन्नाथ वैद्य, धन्वंतरी भुषण पुरस्काराने डॉ. सुधीर भालेराव, आदर्श सोसायटी पुरस्काराने पार्क स्ट्रीट सोसायटी आणि उद्योग भुषण पुरस्काराने संतोष बारणे यांचा सन्मान करण्यात आला.
Discussion about this post