व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- दि.१५ आळंदी येथील सिद्धबेट बंधाऱ्या लगत चा नदीपलीकडील( हवेली भागातील)काही रस्त्यातील भाग इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे.तिथे दुर्घटना घडू नये याकरीता प्रशासनाने त्वरित उपाय योजना करणे गरजचे आहे.
धरणक्षेत्रात गेली काही दिवस संततधार व मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने आळंदीतील सिद्धबेट येथील जुन्या बंधाऱ्या वरून पाणी जात असून भक्ती सोपान पूल ७ दिवस पाण्याखाली आहे.
सिद्धबेटातील परिसरात पूराचे पाणी घुसले आहे. अर्ध्याच्या वर सिद्धबेट परिसर जलमय झालेला दिसून येत आहे.
मुसळधार पाऊस जोराच्या वाऱ्यामुळे सिद्धबेटात छोटी मोठी झाडे पडलेली दिसून येत आहे.
नदीपात्राजवळ, इंद्रायणी नदी घाटावरती नागरीक येऊन नये म्हणून तिथे नगरपालिका प्रशासन अग्निशमन दल व पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे.जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.
माऊली बाग व चाकण चौक येथील पुलालगत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी थर अडकून पडला आहे.
Discussion about this post