व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –आकुर्डी- दि २८ जुलै २२ (गुरवार) येथील दत्तवाडी परिसरात तीन दिवसापासून सापाने आपली दहशत मांडली होती तेथील नागरिकांना तो साप वेगवेगळ्या ठिकाणी दृष्टीत पडत असे त्यामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
अशावेळी तात्काळ मदतीस येणारे कैलास भाऊ कुटे यांना परिसरातील नागरिकांनी कल्पना दिली. सापाच्या दहशतीची बातमी समजतात सर्पमित्र दादा काळभोर यांच्या मदतीने तात्काळ सापाला पकडले. त्यामुळे तेथील परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
कैलास कुटे यांच्या या कामगिरीमुळे परीसरात नागरिकांकडून काैतुक करण्यात येत आहे.
पावसाळा आला असल्याने सापाला राहण्याकरिता जागा मिळत नाही. पर्यायाने ते घरात, गोठ्यात अन्य कोरड्या जागी येतात. साप दिसल्यास घरातील लोक घाबरून जातात. सापाला मारतात. अशा घटना अनेक ठिकाणी घडतात.
पावसाळ्यात सापाच्या बिळात पाणी गेल्याने ते कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात. साप हा मानवासाठी धोकादायक असल्याच्या भावनेतून त्याला मारण्याचे प्रमाण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी दत्तवाडी परिसरातील सर्पमित्रांनी आवाहन केले आहे.
Discussion about this post