व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी शहर सौंदर्यीकरणाची कामे वेगात सुरु असून बहुतांश सुशोभीकरणाच्या कामांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे.
त्या अणुशंगाने प्रभाग क्र १४ मधील द्वारकामाई साईबाबा मंदिर परीसर येथे पेव्हिंग ब्लाकचे काम के के कांबळे व योगिता कांबळे यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे.मंदिर च्या परीसरात ये जा करीता पेव्हिंग ब्लाक काम चालु केल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर स्तरावर 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022’ राबविण्यात येत आहे. या स्पर्धेतील निकषांमध्ये शहरातील मध्यवर्ती चौक, प्रमुख इमारती व रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, तलाव, जलाशये, शिल्प, कारंजे, प्रमुख वारसा स्थळे, यांचे सुशोभीकरण करणे. तसेच प्रमुख ठिकाणी एलईडी प्रकाश योजना व रोषणाई करणे, झोपडपट्टी व गावठाण परिसराची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, शहर कचरामुक्त करणे, ओला व सुका कच-याचे विलगीकरण, प्लास्टिक बंदी,स्वच्छता कर्मचा-यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, नाविन्यपूर्ण योजना राबविणे, कचरा मुक्त वार्ड, रस्त्यांची सफाई, कचरा कुंडी मुक्त वार्ड, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणचे सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.
Discussion about this post