व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी ते निगडी या मार्गावरील चिंचवड (चिंचवड स्टेशन चौक), आकुर्डी (खंडोबा माळ चौक) आणि निगडी (शक्ती-शक्ती समूह शिल्प चौक) असे तीन मेट्रो स्टेशन आहेत. हे अंतर 4.41 किलोमीटर इतके आहे. ते काम दुसर्या टप्प्यातील असल्याने त्यासाठी पुन्हा नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामात हे काम केले जाणार आहे. या विस्तारीत मार्गाचा एकूण खर्च 946 कोटी 76 लाख इतका आहे. कामास किमान 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर निगडी ते दापोडी या संपूर्ण 12.50 किलोमीटर मार्गावर मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. तसेच, पुण्यातील स्वारगेट व कात्रजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यावश्यक असलेली बंद पडलेली पवना जलवाहिनी योजना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणून शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करणे, पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना, सुमारे 32 किलोमीटर अंतराची एचसीएमटीआर (रिंग रोड), इंद्रायणीनगर, भोसरी ते चाकण निओ मेट्रो प्रकल्पाबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र, या महत्वपूर्ण व मोठ्या प्रकल्पांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यासंदर्भात काहीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राज्य शासनाकडून पुन्हा ठेंगा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून निगडीपर्यंत विस्तारासाठी 946 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्या उन्नत मार्गावर तीन स्थानके बांधण्यात येतील. हा उन्नतमार्ग 4.4 किलोमीटर लांबीचा आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा भुयारी मार्ग सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बाजूंचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर कात्रज ते निगडी हा मेट्रो मार्ग सुमारे 27 किलोमीटर लांबीचा होईल.
Discussion about this post