व्हीएसआरएस मराठी न्युज -आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ मिळाली आहे.
प्रारूप मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 नागरिकांच्या हरकती आलेल्या आहेत. हरकतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार आहे. हरकतीचा निपटारा करावा लागणार आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकरीचे आहे.
त्यामुळे 9 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार अशक्य आहे. त्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने 16 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Discussion about this post